
खेड येथे दोन विनापरवाना बंदुका हस्तगत दोन आरोपी ताब्यात
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विनापरवाना बंदूका वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिल्या होत्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विशेष पथक पोलीस निरीक्षक जनार्दन परब यांनी तयार केले होते.या पथकाला दिनांक 19 एप्रिल रोजी खेड येथे गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन विनापरवाना बंदुका मिळून आल्या आहेत.यापैकी एक अनिल भिकू गुहागरकर वय 53 राहणार बोरज शिवफाटा, तालुका खेड यांच्याकडून सिंगल बॅरल काढतुसाची बंदूक आणि आठ जिवंत काढतुसे असे जप्त करण्यात आली.दुसऱ्या कारवाईत राजेश गजानन साळवी वय 53 शेवरवाडी शिव फाटा तालुका खेड यांच्याकडून सिंगल बॅरेल बंदूक आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.दोन्ही प्रकरणातील आरोपींवर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.www.konkantoday.com