
रत्नागिरीतील दूध टंचाई संध्याकाळपर्यंत दूर होण्याची शक्यता
रत्नागिरी ः आंबा घाटातील वाहतूक बंद केल्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग कालपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोल्हापूर, सांगली भागातून येणारे दूध, पालेभाज्या, अंडी आदी माल घेवून येणार्या गाड्या येवू न शकल्याने टंचाई निर्माण झाली आहे. आज सकाळपासूनच रत्नागिरी शहरात दुधाची टंचाई जाणवत असून लोकांना दूध उपलब्ध होवू शकले नाही. रत्नागिरी शहरात वितरण करणार्या गोकुळ व अन्य दूध कंपन्यांच्या दुधाच्या गाड्या आज येवू शकल्या नाहीत. त्यामुळे सकाळी शहराला दुधाचा पुरवठा होवू शकला नाही. याबाबत अधिकृत विक्रेत्यांकडे संपर्क केला असता दूध घेवून निघालेल्या गाड्या रस्त्यात अडकल्या आहेत. त्या सायंकाळपर्यंत रत्नागिरीत येण्याची शक्यता असल्याने निर्माण झालेली दूध टंचाई सायंकाळपर्यंत दूर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com