अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबतचा एक नवा कायदेशीर पेच
विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल सर्व विद्यापीठांचे प्रमुख असून त्यांना शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वाअधिकार आहेत.तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मुख्यमंत्री विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात सूचना देऊ शकतात. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबतचा एक नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे चर्चा करून यावर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी ‘ जीबीव्हीसी’ ची बैठक हा पर्याय असू शकतो,असे मत शिक्षण व विधी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com