केवळ दगाफटका झाल्यामुळे सत्तेपासून आम्हाला दूर राहावे लागले –भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा
महाराष्ट्रात आमचा पराभव झाला नाही तर केवळ दगाफटका झाल्यामुळे सत्तेपासून आम्हाला दूर राहावे लागले. अन्यथा देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. ते शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी नड्डा यांना भाजपला महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षाकडून पराभव का स्वीकारावा लागला, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता.
www.konkantoday.com