हिंदु-मुस्लिमांनी एकत्र येऊन वटपौर्णिमा साजरी केली
आज रत्नागिरी मध्ये हम ग्रुप तर्फे अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.विशेष गोष्ट म्हणजे हिंदु – मुस्लिमांनी एकत्र येऊन स्थापन केलेला हा ‘हम ग्रुप’ आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘हम ग्रुप’ ने हिंदु संस्कृती मधील पारंपारिक वटपौर्णिमा हा सण वडाची झाडे लावून साजरा केला.रस्त्याच्या कडेला वडाची झाडे लावुन ‘हम ग्रृप’ ने पर्यावरण रक्षण आणि हिंदु – मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.
हल्ली वडाची फांदी तोडून घरी नेऊन पुजण्याची प्रथा वाढली आहे .पण फांदी तोडून पर्यावरणाची हानी करु नका, वडाजवळ जाऊन पूजन करा असा मोलाचा सल्ला देऊन ‘हम ग्रुप’ ने वडाची झाडेच लावली.’हम ग्रुप’ चे अध्यक्ष सरताज कापडी यांच्या नेतृत्वाखाली समिती अध्यक्षा सविता चव्हाण , उपाध्यक्षा कश्ती शेख , सदस्य अर्बिना बंदरी , कैफ वागळे यांनी हा उपक्रम पार पाडला.
www.konkantoday.com