वाशिष्ठी पुलावरील खड्डे न बुजविल्यास आंदोलन करणार : शौकत मुकादम

चिपळुणशहरालगत असलेल्या वाशिष्ठीनदीवरील ब्रिटीशकालिन पुलावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य परसले आहे अद्याप पावसाळा सुरु झाला नाही तोपर्यंत ही स्थिती मग पावसाळ्यात येथून वाहन चालविणेही अवघड होणार आहे . या महामार्गाची व पुलाची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल याची जबाबदारी संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीवर राहील असा इशारा माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी दिला आहे .मुंबई -गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे .या मार्गावर बहादूरशेख ते कळंबस्ते दरम्यान दोन पूल आहेत.हे पूल कालबाह्य झाले आहेत . पूल कमकुवत झाल्याने गेल्या पावसाळ्यात १० ते १२ वेळा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती .या पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरु आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button