वाचनालये सुरू करण्याची परवानगी मिळावी -अॅड. दिपक पटवर्धन यांची मागणी
शासनाने मध्यंतरी कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाचनालये बंद केली होती. गेले दोन महिने वाचनालये बंद आहेत. आता रत्नागिरीतील जनजीवन पुर्वपदावर येत आहे. कोरोना रूग्ण वाढत असले तरी त्यांची हिस्ट्री मुंबईची आहे. शासनाच्या आदेशाप्र्रमाणे कार्यालये, व्यापार, उद्योग सुरू झाले आहेत. मात्र वाचनाले ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाचनालयांमध्ये देवाणी घेवाणीसाठी दिवसाला शंभरपेक्षा कमी लोक येतात. ही लोक एकावेळी येत नाहीत. बँका ज्या पद्धतीने ग्राहकाची काळजी घेवून सेवा देत आहेत त्याच धर्तीवर योग्य काळजी घेत डिस्टसिंग पाळत सॅनिटायझर व मास्कचा वापर करीत वाचनालयाची सेवा सुरू करण्याची मान्यता मिळावी. यामध्ये वाचकाकडून आलेले पुस्तक ४८ तासानंतर अन्य वाचकांना देण्याचे निर्बंधही पाळता येतील. वाचनालयाचे कर्मचारी वृद्ध वाचकांना घरपोच पुस्तक सेवा देवू शकतील. यासाठी पुस्तक सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रत्नागिरीत सध्या पाऊस सुरू झाला असून पावसाळ्याच्या दिवसात पुस्तकाची निगा राखली नाही तर दमट हवेमुळे पुस्तके खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मौल्यवान पुस्तकांचा ठेवा नष्ट होण्याची भीती आहे. त्याशिवाय जर वापर झाला नाही तर पुस्तकांना वाळवी लागण्याचाही धोका आहे. सध्याच्या परिस्थितीत वाचकांकडूनही वाचनालय सुरू होण्याबाबत सतत मागणी होत आहे. यामुळे या सर्वाचा विचार करून योग्य त्या अटी घालून वाचनालयाच्या पुस्तक देवाण-घेवाणीचे काम सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com