
दुरुस्तीचा प्रस्ताव रखडल्याने निसर्ग वादळात मिर्या भागाला फटका,बंधार्याला एकेठिकाणी भगदाड
मिऱ्या बंधाऱयाचा प्रस्ताव रखडल्याने या वर्षीही पावसाळ्यात मिऱ्या वासियांना धोका कायम राहणार आहे याची झलक काल निसर्ग वादळाने दिली या वादळात बंधाऱ्यांला एके ठिकाणी भगदाड पडले मिऱया बंधाऱयाची गेल्या काही वर्षांत वाताहात झाली असून दरवर्षी पावसाळ्यात या बंधाऱयाला भगदाडे पडत आहेत गेल्या वेळी पंधरामाड भागात उधानांच्या भरतीत येथील रस्ता वाहून गेला होता त्यानंतर स्थानिक लोकांनी आंदोलन केल्यानंतर शासनाने १९० कोटींचा बंधाऱयाचा प्रस्ताव मंजूर केला होता व त्याचे सर्वेक्षणही सुरू झाले होते मात्र या प्रकल्पाला काही वर्षे लागणार असल्याने या भागातील धोकादायक ठिकाणी दगड भरून बंधाऱ्याची सुरक्षित करण्यासाठी ९८लाखांचा प्रस्ताव करण्यात आला होता हे काम पावसापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते मात्र हा प्रस्ताव धूळखात पडल्याने बंधाऱ्याची दुरुस्ती होऊ शकली नाही त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात मिर्या वासियांना भीतीच्या छायेत राहावे लागणार आहे
www.konksntoday.com