
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर स्वतःला क्वॉरंटाईन करून घेणार
राज्य शासनाने कोरोनाचे उपचार देण्याकरिता खासगी क्षेत्रातील वैद्यकीय उपचारांसाठी जे काही दर निश्चित केले आहे, त्यामुळे डॉक्टरांवर दवाखाने बंद करण्याची वेळ असून हा अन्याय आहे. तसेच हॉस्पिटल्सच्या न परवडणाऱ्या दरात थोडीशी कुचराई झाल्यास ऑडिटर पाठवून डॉक्टरांवर कारवाया केल्या जात आहेत, या सर्वांच्या निषेधाचा भाग म्हणून राज्यातील डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने सामुदायिकरित्या ‘क्वॉरंटाईन’ (विलगीकरण) करून घेण्याचा निर्णय घेतला असून या क्वॉरंटाईनची मुदत 14 दिवसांपर्यंत असू शकेल असे म्हटले आहे. अशा पद्धतीने डॉक्टरांनी खरंच क्वॉरंटाईन करून घेतले तर याचा मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्रास होऊ शकतो.
www.konkantoday.com