
कडवई येथील बँक ऑफ इंडियासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी स्वराज्य संघटनेने घेतला पुढाकार
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोशल डिस्टंसिंगला खूप महत्व आले आहे. लोकांना बँकेत किंवा अन्य ठिकाणी जावे लागणार आहे. मात्र त्या ठिकाणी त्यांच्यात योग्य ते अंतर असणे गरजेचे आहे. कडवई येथील बँक ऑफ इंडियात व शाखेत नेहमी खातेदारांची गर्दी होत असते त्यामुळे ग्राहकांनी सुरक्षित डिस्टंसिंग ठेवून उभे रहावे, यासाठी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश गुरव यांनी बँकेचे अधिकारी सकपाळ साहेब यांची भेट घेतली. तसेच स्वराज्य संघटनेचे सहसचिव राहुल सागवेकर, प्रतीक गुरव, प्रयाग गुरव, ऋषिकेश गुरव, साईराज गुरव या सर्वांनी बँकेच्या समोर शोशल डिस्टंसिंगसाठी ऑईलपेंटने चौकोन आखून दिले. यामुळे आता ग्राहक या चौकोनात सुरक्षित अंतर ठेवून उभे राहू शकणार आहेत.
www.konkantoday.com