
आपण सुरक्षेची हमी देत नसाल तर परीक्षा रद्द करण्यात याव्यात
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द करण्याची विनंती नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंना निमा महाराष्ट्र स्टूडंन्ट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. “पहिली सुरक्षा, नंतर परीक्षा’ अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर आपण सुरक्षेची हमी देत नसाल तर परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक मंडळ, आयुर्वेदा संचालक, आयुर्वेद अधिष्ठाता यांना पाठविल्या आहेत.
www.konkantoday.com