राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७७ हजार ७९३ वर पोहोचला
राज्यात काल दिवसभरात १ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३ हजार ६१८रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७७ हजार ७९३ वर पोहोचला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे
राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात २ हजार ९३३नवे रुग्ण आढळले आहे. सध्या ४१ हजार ३९३रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
www.konkantoday.com