रत्नागिरीतील कोविड लॅबचा शुभारंभ आता ९ जूनला
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅबला शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी लागणारी १ कोटी ८ लाखांची रक्कम मंजूर केली आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ७ जूनला होणार होता परंतु यासाठी आवश्यक असणारी मशिनरी नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळामुळे दोन दिवस उशीरा पोहोचली आहे. आजच ही मशिनरी रत्नागिरीत दाखल झाली आहे. त्यामुळे आता या कोरोना टेस्टिंग लॅबचा शुभारंभ ९ तारखेला होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com