कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये गेल्या महिनाभरात दारु विक्रीतून राज्याला ७७६ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल केवळ पुणे जिल्ह्यातून प्राप्त झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकारने मार्च-एप्रिल महिन्यात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु पुन्हा चार मेपासून दारु विक्री सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या महिनाभरात वाईन शॉप, देशी दारू दुकान आणि बिअर शॉपींमधून झालेल्या दारु विक्रीतून ७७६ कोटींचा महसूल राज्याला मिळाला आहे. परंतु दर महिन्याच्या महसुलाच्या हे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यातून सुमारे १०० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
www.konkantoday.com
Back to top button