
रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदीचे नवीन आदेश लागू, केशकर्तनालय राहणार बंद
रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज ४/०६/२० पासून नवीन आदेश जिल्ह्यात जारी केला आहे.या आदेशा प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी राहणार आहे.अत्यावश्यक सेवा देणारे तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना यामधून मुभा देण्यात आली आहे.या व्यतिरिक्त जर कोणी यामध्ये अनावश्यक बाहेर फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.याआधी आदेशाप्रमाणे केशकर्तनालय, सलून,स्पा यांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.मात्र नवीन आदेशाप्रमाणे आता ही दुकाने सुरू राहणार नाहीत.तसेच पूर्वी अंत्यविधीसाठी ५० लोकांना परवानगी देण्यात आली होती मात्र आता फक्त 20 लोकांन पेक्षा जास्त लोकांना अंत्यविधी साठी सहभागी होता येणार नाही.तसेच शाळा कॉलेज विद्यापीठ यातील कर्मचारी फक्त अशैक्षणिक कामा साठीच जाऊ शकतात.
व्यापारी दुकानें ही पूर्वी प्रमाणे च वेळेनुसार सुरु होतील.पूर्वी प्रमाणे दुकानें सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंतच रहाणार आहेत.इतर आदेश पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत असे जिल्हा प्रशासना कडून सांगण्यात आले आहे. www.konkantoday.com