न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार
लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून ५० टक्के न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयांनी सूचना दिल्या आहेत.
२३मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद असल्याने तातडीच्या दाव्यांवर सुनावणी सुरू होती. मात्र अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आठ जूनपासून सकाळी १० ते दुपारी एक आणि दुपारी अडीच ते साडेपाच यावेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. ५० टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज चालेल. मात्र, प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन शिफ्ट वगळता कामाच्या वेळा बदलू शकतात.
www.konkantoday.com