ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने हुबेहूब बनावट ई पास बनवून दोघे भामटे अटकेत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकजण शासनाचा पास मिळवून गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. नेमका याचाच फायदा उचलत दोघे भामटे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने हुबेहूब बनावट ई पास बनवून त्याचा गैरफायदा घेत होते. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने त्या दोघांचा धंदा उद्धवस्त केला.
कल्याण, उल्हासनगर येथील काही लोक आर्थिक फायद्यासाठी राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी नागरिकांना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने अनधिकृत ई पास मिळवून देत असल्याची माहिती युनिट 1 ला मिळाली.त्यानुसार प्रभारी निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक महेश तावडे व पथकाने तपास केला असता कल्याण येथील विकल्प टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा मालक विकास महाजन हा बनावट ई पास बनवून ते विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर उल्हासनगरला राहणारा अनिल यशवंते हा विकासला बनावट पास बनवून देत असल्याचे निष्पन्न झाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button