
जिल्हयात गेल्या 24 तासात सरासरी 93.44 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी दि. 04: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 93.44 मिमी तर एकूण 841 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लांजा तालुक्यात 131 मिमी झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात अन्य ठिकाणी पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 130 मिमी, दापोली 125 मिमी, खेड 76 मिमी, गुहागर 77 मिमी, चिपळूण 102 मिमी, संगमेश्वर 73 मिमी, रत्नागिरी 40 मिमी, राजापूर 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com