एक हात मदतीचा … मुंबई एकी ग्रुपतर्फे आज २ महीने लॉकडाऊन मधील गरजवंत कलाकार व तंत्रज्ञ यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
आज संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस ने हैराण करून सोडले आहे. अश्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना सारे जग करत आहे, आणि या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आज आपापल्या परीने प्रत्येक जण जे जे शक्य होईल ते करत आहे. मुंबई येथील सिनेसृष्टीतील काही समाजसेवक गरजूंच्या मदतीला धावले. “*एक हात मदतीचा…या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्यांना गरज आहे तेथे गरजूंच्या गरजेनुसार रेशनधान्य चे वाटप करत आहेत. हि दोस्ती तुटायची नाय. असे म्हणत आज मदत केली जात आहे, आज मराठी नाट्यसृष्टी , चित्रपट सृष्टी , मालिकासृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा मुंबई एकी ग्रुपनी ही एक हात मददतीचा देत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.आज लॉकडाऊन होऊन खूप दिवस झाले तरी प्रत्येकाच्या घरात रेशनधान्य ची टंचाई जाणवू लागली.सध्या या कोरोनाचा काळात हाताला काम नाही शिल्लक राहिलेला पैसा संपत आला.काय करावे जगण्यासाठी असा प्रश्न समोर उभा राहिला आहे , असे असतानाच मुंबई एकी ग्रुपमध्ये चर्चा झाली आणि मग सर्वमित्रच कोरोना मदत योद्धा बनले. ते आहेत – विजय पाटकर सर ( अभिनेता- दिग्दर्शक- निर्माता ) ,दिपक कदम सर ( दिग्दर्शक ) , विजय राणे सर ( दिग्दर्शक) ,सिद्धि कामत ( अभिनेत्री ), शिल्पा सावंत( अभिनेत्री), अमिता कदम ( नुत्य दिग्दर्शिका ),पल्लवी पाटील ( अभिनेत्री),विशाल सावंत ( कला दिग्दर्शक ), मनीष मेहेर ( दिग्दर्शक ),अमोल भावे ( दिग्दर्शक ) ,मयुरेश कोटकर(अभिनेता), गणेश तळेकर(कार्यकारी निर्माता),दिपक सावंत ( अभिनेता ) राजेंद्र सावंत (कार्यकारी निर्माता),शिवाजी रेडकर(अभिनेता),अनंत मेस्त्री(कला दिग्दर्शक),किरण कुडाळकर (निर्माता),आर्यन देसाई (कॅमेरामन), रामदास तांबे (दिग्दर्शक),सचिन गायकवाड (दिग्दर्शक),यशराज सुर्वे (संकलक), नूतन जयंत ( अभिनेत्री ) ,सुवर्णा काकड ( समाजसेविका ), या मुंबई एकी ग्रुपच्या मित्रांचा ग्रुप गेले २ महिने हाताला काम नसलेल्या या कलाक्षेत्रातील गरजवंत कलाकार आणि तंत्रज्ञ यांना रेशनधान्य वस्तू देऊन एक हात मदतीचा देत आहे.विजय पाटकर सर, दिपक कदम,प्रशांत भाटकर,सतीश देसाई, डॉ.किशोर कुशाले यांनी आर्थिक मदत करून खूप मोठे मौलाचे सहकार्य केले. आणि आजचे 3 विनोदाचे बादशहा प्रसाद खांडेकर, जयवंत भालेकर, प्रणव रावराणे मुंबई एकी ग्रुप बरोबर मदतीला धाऊन आले.
www.konkantoday.com