रत्नागिरी जिल्ह्यात आज १२ कोरोना पॉजिटिव रुग्ण सापडले,जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३१९
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त झालेल्या अहवालांपैकी १२ अहवाल पॉजिटिव आले आहेत. त्यापैकी कामथे येथील ८, मंडणगड येथील १,संगमेश्वर येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे आता जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव झालेल्या रुग्णांची संख्या ३१९ झाली आहे.तर आज आणखी ४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२४ झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण आलेल्या चाकरमानी नागरिकांची संख्या १,१३,३६३ झाली आहे.जिल्ह्यात होम क्वारंटाइन असणारांची संख्या आता झपाटय़ाने कमी होत असून आजअखेर ही संख्या ७७,७३२ एवढे आहे तर संस्थात्मक क्वारंटाइन खाली असणाऱ्यांची संख्या १८० आहे.
www.konkantoday.com