रत्नागिरी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अद्याप ६५ जागांवर प्रवेश शिल्लक


रत्नागिरी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अद्याप ६५ जागांवर प्रवेश शिल्लक आहेत. कारपेंटरच्या १३, डेस्क टॉप पब्लिकेशनच्या १९, फूड प्रॉडक्शन व जनरलच्या ७, फ्रंट ऑफीस अटेंडसच्या १९, शिवणकामच्या ७ मिळून एकूण ६५ जागा अद्याप शिल्लक असून विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.डेस्क टॉप पब्लिकेशन, फूड प्रॉडक्शन व जनरल, फ्रंट आॅफीस अटेंडस हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने अनेक विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेत आहेत. एक ते दोन वषार्चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील एकूण दहा आयटीआय असून २९३८ जागांपैकी २०९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे.
दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दि.६ सप्टेंबर पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दि.१२ सप्टेंबर रोजी शेवटचा समुपदेशन राऊंड शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button