
महिलांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी खेडमध्ये सक्रीय?
महिलांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी खेडमध्ये सक्रिय झाल्याची घटना घडली आहे खेडमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी पंचावन्न वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि बोटातील अंगठी घेऊन भामट्यांनी पलायन केले या महिलेला अनोळखी इसमाने साईमंदिर परिसरात थांबवले आपण व्यवसायाने सोनार व्यापारी असून आपल्याला देवाला दान करायचे आहे असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला त्यानंतर महिलेच्या हातात आदी शंभर रूपयांची नोट आणि त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत शंभर रुपयांच्या तीन नोटा आणि बिस्किटचा पुडा दिला त्यानंतर महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील चेन प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवण्यास सांगितले काहीवेळाने भामटा दागिने घेऊन फरार झाला याबाबत सदर महिलेने पोलीस स्थानकात तक्रार केली असून अशा प्रकारे एखादी टोळी या परिसरात सक्रिय झाल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे पोलिसांना आवाहन केले आहे
www.konkantoday.com