
लोटे परिसरात औद्योगिक क्षेत्रात येणार्या राज्य-परराज्यातील ट्रक चालकांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने आरोग्य दक्षतेच्या दृष्टीने अनेक आदेश दिले आहेत. त्या पद्धतीने तपासणे सुरू आहे. सध्या शासनाने उद्योगांना व माल वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर राज्य-परराज्यातून मालवाहतुकीचे ट्रक येत आहेत. लोटे परिसरात अंदाजे रोज ३०० ते ४०० ट्रक येत असतात. या ट्रकमध्ये चालक, क्लिनर अशी माणसे असतात. परंतु त्या ठिकाणी त्या चालकांसाठी कोणतीच सोय नसल्याने हे चालक उघड्यावरच प्रातःविधीला बसतात. कोरोनाच्या या परिस्थितीत यावर निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. तसेच कंपन्यांनीही अशा येणार्या मालवाहतुकीच्या ट्रकच्या चालकांबाबत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच याकडे जिल्हा आरोग्य विभागानेही लक्ष देणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com