
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७० हजार १३वर पोहोचली
राज्यात काल कोरोनाचे २ हजार ३६१नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७० हजार १३वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७७९रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ३७ हजार ५३४रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात काल ७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या २३६२ इतकी झाली आहे.
www.konkantoday.com