
रत्नागिरी जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांची त्रिशतकाकडे वाटचाल,१० नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांच्या अहवालांपैकी १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९७ झाली आहे.काल जे १० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यातील ९ जण संगमेश्वर येथील रुग्णालयात दाखल आहेत.तर एका रुग्णाचा ३० मे रोजी मृत्यू झाला होता मात्र त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० झाली आहे.कोरोनावर अनेक रुग्ण मात करीत असून आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.
www.konkantoday.com