रत्नागिरी जिल्ह्यात ८२८ बालके कुपोषित

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात रत्नागिरी जिल्ह्यात ८२८ बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामधील ६४ बालके अतितीव्र कुपोषित आहेत. गतीमान जीवन व बदललेली आहार पद्धती यामुळे जिल्ह्यात कमी वजनाच्या जन्मलेल्या बालकांची संख्या वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी जि.प. महिला व बालकल्याण विभागाकडून आहार व औषधे दिली जातात. त्यामध्ये तीन वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश असतो. व दर तीन महिन्यांनी याचे सर्व्हेक्षण होते. कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी अंगणवाडी सेविकांनी कुपोषित बालकांना वेळच्या वेळी पुरक न्युट्रीशियन फुडचे वाटप केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button