देवरुख येथील नातेवाईकांचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारा साठी निघालेल्या मोरे व पराडकर कुटुंबातील पाच जणांवर मृत्यूने घाला घातला, दुर्दैवी घटनेने जिल्हा हादरला


देवरुख येथील नातेवाईकांचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मोरे, पराडकर कुटुंबातील पाच जणांवर मृत्यूने घाला घातला आहे अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी हे कुटुंब रात्री मुंबई येथून रात्री निघाले त्यांनी त्यासाठी खाजगी टॅक्सी आरक्षित केली होती मात्र पहाटेच्या सुमाराला टॅक्सी चालकाला झोप लागल्याने ही कार खेडमधील उंच असलेल्या जगबुडी पुलावरून शंभर ते दीडशे फूट खाली कोसळली या अपघातात दोन्ही कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या
अपघातातील मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) यांचा समावेश आहे. दोन कुटुंबातील हे लोक मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाले होते, त्याचवेळेला निष्ठुर नियतीने डाव साधला.

पहा व्हिडिओ……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button