महाराष्ट्र शासनाकडून राज्याला जे आदेश देण्यात आले ते इंग्रजी भाषेत -मनसेकडून आक्षेप
देशभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ मे रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपला. १ जूनपासून अनलॉक १ देशात सुरू झाला आहे. केंद्राने मात्र राज्य सरकारला आपल्या पातळीवर पुढील निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून राज्याला जे आदेश देण्यात आले ते इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहेत. यावरून मनसेकडून आक्षेप घेण्यात आला असून मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी याबाबत ट्विट करून इंग्रजीला महाराष्ट्राची राजभाषा केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे
www.konkantoday.com