भाजप नेते निलेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान
महाराष्ट्रातील सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करत, सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.
www.konkantoday.com