निसर्ग’चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड, गुहागर, दापोली या तीन तालुक्यांना बसण्याची शक्यता

स. ९ ते १२ या कालावधीत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत वीजपुरवठा पूर्णतः खंडित ठेवण्यात येणार

निसर्ग’चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड, गुहागर, दापोली या तीन तालुक्यांना बसण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे आता तिथे हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुमारे चार हजार लोकांचे स्थलांतर केले आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी बुधवारी (ता. 3) संचारबंदी लागू केली असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले
या चक्रीवादळाचा परिणाम उद्या पहाटेपासून सुरु होणार असून स. ९ ते १२ या कालावधीत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत वीजपुरवठा पूर्णतः खंडित ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्त भडकवाड आदी उपस्थित होते. निसर्ग वादळ मंगळवारी सायंकाळी गोवा, सिंधुदुर्गपासून पुढे सरकत होते. ते वादळ पहाटेच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागाकडून अलिबागकडे रवाना होणार आहे. एनडीआरएफची वीस जणांची एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली असून दापोली येथे थांबणार आहे. दुसरी तुकडी दाखल होत असून ती मंडणगडमध्ये थांबवण्यात आली आहे.
रत्नागिरी, राजापूरचा किनारी भाग कमी प्रभावीत होईल. मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वेळास या किनारी भागातील सुमारे १२०० लोकांना, दापोलीतील २३५ तर गुहागरमधील ११९६ लोकांचे स्थलांतर मंगळवारी सायंकाळपर्यंत केले होते. एकट्या दापोली तालुक्यातील २३गावे किनार्‍यावर असून त्यांच्याव्या लक्ष केंद्रीत केले आहे. या तिन तालुक्यातील पावणेतीन हजार लोकांचे स्थलांतर मंगळवारी केले. सुमारे चार हजाराहून अधिक लोक स्थलांतरीत केली जाणार आहेत.
वादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून महावितरण, बंदरविभाग, मत्स्य विभाग, जिल्हा परिषद, पालिकांसह तालुकापातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली आहेत. वादळात जिवीतहानी व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात उद्या दिवसभर संचारबंदी लागू केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button