
रत्नागिरीच्या मुलींची उपांत्यपूर्व फेरीत धडक
धाराशिव, ठाणे, पुणे, सांगलीच्या दोन्ही संघांची उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
अहिल्यानगर, क्री. प्र. : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने अहिल्यानगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू असलेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत प्रत्येकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रत्नागिरी च्या मुलींच्या संघाने अहिल्यानगरवर सहज मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तरी कुमार संघाने मुंबई ला जादा डावापर्यंत झुंजवले. मात्र ड्रीम रन मध्ये मिळालेल्या एक गुणामुळे पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, कुमार गटात धाराशिव-मुंबई, मुंबई उपनगर-पुणे, सोलापूर-ठाणे, सातारा- सांगली तर मुली गटात धाराशिव- रत्नागिरी, नाशिक-ठाणे, सोलापूर-सातारा, पुणे-सांगली असे संघ उपांत्यपूर्व फेरीत आमने सामने येणार आहेत. शनिवारी सकाळच्या सत्रात हे सामने होणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे निकाल पुढील प्रमाणे :
रत्नागिरी मुली संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना अहिल्यानगर संघावर 1 डाव २४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. रत्नागिरी संघाकडून ऋषी चव्हाण ४.४० मी. संरक्षण आणि आक्रमणात २ गुण साक्षी लिंगायतने संरक्षणात ३.५० मी. आणि आक्रमणात ४ गुण मिळवले. आर्य दोर्लेकरने २.४० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले.
मुंबई विरुद्ध रत्नागिरी हा मुलांचा सामना अतिशय अटीतटीचा झाला निर्धारित वेळेत बरोबरीत सुटलेल्या सामन्यात ज्यादा वेळेत मुंबई संघाने १ गुणाने आणि विजय संपादन केला. मुंबई संघाकडून मनीष पालये याने १.१०, १.५० व १.२० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात एक गडी बाद केला तर निहाल पंडित ने २.०० व १.०० मिनिट संरक्षण करत आक्रमणात ४ गडी बाद केले. निमेश चौगुलेने १.०० मिनिट संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद केले. रत्नागिरी संघाकडून आशिष बालदेने ३.००, १.३० व १.०० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गडी बात केले. साईश बालदेने १.४०, १.३० मी. संरक्षण केले. अथर्व गराटे ने १.०० मी., १.१० मी. संरक्षण करून आक्रमणात ८ गडी बाद केले. मुंबई मुलांच्या संघाने रत्नागिरीवर ड्रिम रानवर १ गुणांनी विजय मिळवला.
कुमार गटात सांगली विरुद्ध पालघर या सामन्यात सांगली ने एक डाव सहा गुणांनी विजय संपादन केला सांगली संघाकडून संकेत वाघमारे ने २.३० मी. संरक्षण केले. पार्थ देवकातेने २.३० मी. संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. श्री दळवीने २.१० मिनिट नाबाद संरक्षण केले. अथर्व पाटीलने ३.३० मी. संरक्षण करताना आक्रमणात १ गडी बाद केला पालघर संघाकडून प्रेम पाटील ने १.१० मी. संरक्षण करत आक्रमणात १ गडी बाद केला.
मुलांच्या गटात ठाणे बीडवर १ डाव २४ गुणांनी विजय मिळवला. ठाणे संघाकडून ओंकार सावंतने ४.१० सोहम जुंगारेने ४.३० मी. संरक्षण केले.
मुलांच्या गटात धुळे जिल्ह्यावर सोलापूरने १ डाव ४३ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. सोलापूरकडून अरमान शेख ४.५० मी. रवी दरोगोंदा आणि अकबर शेख यांनी प्रत्येकी २.५० मी. संरक्षण केले.
मुलींच्या गटात पुणे संघाने उपांत्यपूर्व फेरी प्रवेश करताना जालना संघावर एक डाव व ८ गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाकडून अपर्णा वर्धेने नाबाद ३.२० मी. व २.४० मी. संरक्षण केले. श्वेता नवलेने ३.३० मी. संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. धनश्री लवाटेने २.३० मी. संरक्षण केले.
जालना संघाकडून वैष्णवी मदने एकतर्फी लढत देत ४.०० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले.
मुलींच्या गटात सांगली संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना परभणी संघावर १ डाव २६ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. सांगली संघाकडून धनश्री तामखडेने ३.०० मी. संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले सानिका चाफेने २.२० मी. संरक्षण करून २ गडी बात केले कृतिका अहीरने २.०० मी. संरक्षण करून एक गडी बाद केला. परभणी संघाकडून समृद्धी वागणे १.०० मी. संरक्षण केले.
मुलींच्या गटात ठाणे संघाने धुळेवर १ डाव १७ गुणांनी विजय मिळवला. ठाणे संघाकडून धनश्री कंकने ४.३० मी., दीक्षा काटेकराने ३.२० मी. तर प्रणिती जगदाळेने ३.०० मी. व नाबाद १.१० मी. संरक्षण केले. श्रुती चोरमारेने आक्रमणात १० गुणांची कमाई केली. धुळे संघाकडून हर्षदा कोळीने २.१० मी. संरक्षण करून आक्रमणात ८ गुण संपादन केले.
मुलींच्या गटात धाराशिव संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवाह केला. नंदुरबार संघावर १ डाव ३३ गुणांनी विजय मिळवला. धाराशिव संघाकडून मिथिला पवार ४.२०, राही पाटील ३.४० मी. संरक्षण केले. मुग्धा सातपुते आणि सिद्धी भोसलेले प्रत्येकी ८ गुणांची कमाई केली. नंदुरबार संघाकडून शालिनी कोकणेने १.०० मी. संरक्षण केले.
मुलींच्या गटात सोलापूर संघाने मुंबईवर १ डाव ११ गुणांनी विजय मिळवला. सोलापूर संघाकडून कल्याणी लामकानेने ५.०० मी. स्नेहा लामकानेने ४.०० मी. संरक्षण करून एकतर्फी विजय संपादन केला. मुंबई संघाकडून कादंबरी तेरवणकरने २.०० मी. संरक्षण केले.
मुलींच्या गटात नाशिक उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मुंबई उपनगरवर ११ गुणांनी विजय मिळवला. नाशिककडून निर्मला ४.४० मी. सुषमा चौधरी २.२० मी.,रोहिणी भंवर २.०० संरक्षण केले. उपनगरकडून दिव्या गायकवाडने अष्टपैलू खेळ करत १.१० मी. संरक्षण आणि आक्रमणात ६ गुण संपादन केले.




