
उद्या दापोली तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद रहाणार असून नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये -प्रांताधिकारी दापोली
उद्या बुधवार दिनांक 3 जून रोजी निसर्ग चक्रिवादळाचा धोका असल्याने दापोली तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद रहाणार असून नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये व सतर्क रहावे अशी माहिती दापोली चे प्रांताधिकारी शरद पवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील किनारपट्टीवर सर्व ग्रामपंचायती, तटरक्षक दल, पदाधिकारी,समाजसेवक यांची तालुका प्रशासनाने भेट घेऊन खबरदारी च्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.
तसेच अगदी किना-यालगत ज्या नागरिकांची घरे आहेत.तसेच ज्या घरांना धोका पोचू शकतो अशा नागरिकांनी गावातील शाळा, समाजमंदिर किंवा सुरक्षित ठिकाणी उद्या दुपारपर्यंत स्थलांतरीत होऊन सतर्क राहून काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली.
www.konkantoday.com