शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याची माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची मागणी
रत्नागिरीत नगर परिषदेने गेल्या दोन अडीच महिन्यांपूर्वी रत्नागिरी शहरात एक दिवस आड पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मध्यंतरी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. काहीजणांनी तर पाण्याचे टँकरही विकत घेतले होते. आता नगर परिषदेने शीळ धरणाची मुख्य वाहिनी जोडली आहे. त्यामुळे शीळ धरणातून आता रत्नागिरीत पाणी येणे सुरळीत झाले आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांना दररोज पाणी देण्याची व्यवस्था करावी व पाण्यामुळे लोकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली असून त्याचे त्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. तसेच त्यांनी रत्नागिरी शहरातील पावसापूर्वीची पाहणी करण्याबाबतही एक निवेदन दिले असून त्यामध्ये शहरातील रस्ते दुरूस्त करून रस्त्यातील खड्डे बुजविणे आदी कामे करणे आवश्यक असून यासाठी डांबराने खड्डे भरण्याचे काम जरूरीचे आहे. पावसात हे खड्डे मोठे झाल्यास रस्ते खड्डेमय होण्यास वेळ लागणार नाही. नगराध्यक्ष ५८/२ चा वापर करून खड्डे भरण्याचे टेंडर काढतात ते गैर असल्याचेही कीर यांनी म्हटले आहे. तसेच शहरातील गटारे, नाले, वहाळ, परे हे साफ करण्याचे काम तातडीने करावे अशीही त्यांनी मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष निलेश भोसले, बहुजन समाज पार्टीचे अनिकेत पवार, समीप गवाणकर आदीजण उपस्थित होते. दरम्याने शहराला उद्यापासून नियमित पाणी पुरवठा होईल असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी जाहीर केले आहे.
www.konkantoday.com