लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावणार
लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. देशभरातून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये महाराष्ट्रातून सुटणाऱ्या गाडय़ांचाही समावेश आहे. या गाडय़ांचे आरक्षण आधी ३० दिवस अगोदर करण्याची अट होती. परंतु त्यात बदल करुन १२० दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला.
www.konkantoday.com