रत्नागिरी जिल्ह्यात एकूण कोराेना पॉझिटीव्हची संख्या २८७,आज १८रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या ४२ कोरोना संशयितांचे अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी १८ अहवाल पॉझिटिव आले आहेत.१८ पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांपैकी रत्नागिरीतील ७,कळंबणी येथील ८,गुहागर येथील १ आणि राजापूर येथील २ असे आहेत.त्यामुळे जिल्ह्यात एकूण आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८७ झाली आहे.रत्नागिरीतील सात रुग्णांपैकी सहा रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.इतर सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दरम्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना मधून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.काल एका रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १०० झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button