बजाज फायनान्सकडून बोलत असल्याचे सांगून २८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
संगमेश्वर येथे राहणारी रिना अब्दुल अजिज म्हाते यांना बजाज फायफान्सकडून बोलत आहे असे सांगून त्यांचा एटीएम कार्ड नंबर घेवून त्यांची २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी म्हाते यांना अज्ञात इसमाने मोबाईलवर फोन करून आपण बजाज फायनान्सकडून बोलत असून तुमचे ईएमआय कार्ड रद्द झाले आहे. त्यामुळे फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्जाचे हप्ते तुमच्या खात्यात परत जात आहेत. असे सांगून बँकेचे एटीएम नंबर द्या अशी त्याने मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी आरडीसी बँकेच्या एटीएम कार्डचा नंबर सांगितला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या खात्यातील २७,९९९ रुपये रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com