
बेरोजगारांची संख्या वाढली
रत्नागिरी ः प्रमोद महाजन कौशल्य विकास रोजगार व उद्योग मार्गदर्शन या केंद्रात जिल्ह्यातील ५६ हजार ४९ तरूण, तरूणींनी बेरोजगार म्हणून नोंदणी केली आहे. या कार्यालयाकडे आतापर्यंत ३८५१३ पुरूष व १७५३६ महिलांनी बेरोजगार म्हणून नोंद केली आहे.
गेल्या दीड वर्षाच्या काळात यापैकी १६१८ जणांना खाजगी कंपन्यात नोकर्या मिळाल्या आहेत. पूर्वी खाजगी उद्योगांना या कार्यालयातील नोंदणीकृत बेरोजगारांना प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे.