तालुका कृषि विभागाकडून रत्नागिरी तालुक्यात खत व बियाण्यांचे वाटप
कोरोनाच्या साथीमुळे सध्या महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण असताना आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे आता शेतीची प्राथमिक कामे शेतकर्यांनी सुरू केली आहेत. यासाठी शेतकर्यांना साहित्यासह बियाणे व खते यांची कमतरता भासू नये म्हणून रत्नागिरी तालुका कृषि विभागाकडून खते व बियाणे यांचा पुरवठा शेतकर्यांना देण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात १६२ मे. टन खत तसेच १२०.३० बियाणे असे तालुक्यातील दोन हजार पाचशे त्र्याऐंशी शेतकर्यांना वाटप करण्यात आले आहे.
www.konkantoday.com