
कॉरंटाईन केल्याने तुम्ही बाहेर फिरू नका असे सांगणार्याला गैरसमजातून मारहाण
दापोली देवूळवाडी वणोशी येथील रितेश जाधव यांनी अन्य कॉरंटाईन लोकांना तुम्ही घराबाहेर पडू नका असे सांगितले असता ते आपल्याला बोलले आहेत असा गैरसमज करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी वणोशी येथील राम पाटणे, तेजस पाटणे, राहुल पाटणे या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी रितेश जाधव व राम पाटणे हे एकमेकांच्या शेजारी आहेत. पाटणे कुटुंबिय हे नोकरीनिमित्त पुण्यात असतात. ते पुण्याहून आल्यानंतर त्यांना १४ दिवस होम कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही घराबाहेर पडू नका असे सांगितले होते. व नंतर त्या लोकांची कॉरंटाईनची मुदत संपल्यानंतर ते गावात व अन्य ठिकाणी फिरत होते. त्यावेळी फिर्यादी रितेश जाधव याने त्यांच्या शेजारी राहणार्या दुसर्या पाटणे कुटुंबियातील लोकांना तुम्ही होम कॉरंटाईन आहात बाहेर पडू नका असे सांगितले परंतु फिर्यादी रितेश हे आपल्याला बोलत आहेत असा समज करून घेवून राम पाटणे व अन्य तिघांनी रितेश याला माडाच्या झापाने व काठीने मारहाण केल्याची फिर्याद त्याने केली आहे.
www.konkantoday.com