केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आला
राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना आता केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने केरळमधून डॉक्टर्स आणि परिचारिकांना (नर्सेस) पाचारण करण्याचा विचार बोलून दाखवला होता. यानंतर लगेचच केरळने पुढाकार घेत मुंबईतील डॉक्टर्सच्या मदतीसाठी १०० जणांचे पथक पाठवले आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. केरळच्या टीव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संतोष कुमार या पथकाचे नेतृत्व करत आहेत.
www.konkantoday.com