आजपासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबवण्यात येणार
देशातील गरिबांना दिलासा देण्यासाठी आजपासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून होईल. या योजने अंतर्गत रेशनकार्डचा लाभ देशात कुठुनही घेता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करताना याचा उल्लेख केला होता. केंद्र सरकारच्या या योजनेचा ६७ कोटी लोकांना फायदा होईल.
सध्या ज्या जिल्ह्यात रेशनकार्ड बनलेलं आहे त्याच जिल्ह्यात तुम्हाला रेशन मिळू शकेल. दुसरीकडे तुम्ही जिल्हा बदलल्यास तुम्हाला लाभ मिळत नाही. एक देश, एक रेशन कार्ड अस्तित्त्वात आल्यानंतर, दारिद्र्य रेषेखालील लोक स्वस्त किंमतीत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेशन खरेदी करू शकतात.
www.konkantoday.com