प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानं यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन
बॉलीवूडला अनेक प्रसिद्ध गाणी देणा-या साजिद-वाजिद या संगीत दिग्दर्शक जोडी तुटली आहे. प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानं यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, असे संगीतकार सलीम मर्चंट यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या.
www.konkantoday.com