
कळंबस्ते रेल्वे फाटक उड्डाण पूल, २० कोटी ५२ लाखांच्या निधीची आवश्यकता.
चिपळूण-कळंबस्ते रेल्वे फाटक येथे उड्डाण पूल निर्मितीसाठी सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकानुसार सुमारे २० कोटी ५२ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. या उड्डाणपूल निर्मितीचे कार्य राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भूसंपादन प्रक्रियेसह आणि निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे प्रयोजन असल्याचे उत्तर कोकण रेल्वे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी आमदार शेखर निकम यांना पाठवलेल्या पत्रात दिले आहे.आमदार निकम यांनी आपल्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात असलेल्या रेल्वेस्थानकातील प्रश्न, उपाययोजना आणि जलद गाड्यांच्या थांब्याबाबत कोकण रेल्वेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्रातील मागण्यांची दखल घेत केल्या जाणार्या कार्यवाहीचा, उपाययोजनांचा खुलासा आपल्या पत्रामध्ये केला आहे.
सावर्डे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असणार्या ओव्हर ब्रीजसाठी (एफओबी) अंदाजे २.७ कोटी तसेच उच्चस्तरीय प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी अंदाज १.२८ कोटी एवढा निधी आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागातर्फे निरीक्षण करून निधीच्या उपलब्धतेनुसार सक्षम अधिकार्यांमार्फत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.www.konkantoday.com