
संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी निकमवाडी येथे झालेल्या मारहाणीमध्ये चौघेजण जखमी
संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी निकमवाडी येथे झालेल्या मारहाणीमध्ये चौघेजण जखमी होण्याचा प्रकार घडला. आरोपीने कोयत्याने हल्ला केल्याने दोघांवर कोयत्याचे वार झाले आहेत. याप्रकरणी कुचांबे व कुटगिरी निकमवाडी येथील १३ जणांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आरती कृष्णा निकम .कुटगिरी निकमवाडी यांनी खबर दिली आहे. मारहाणीमध्ये आरती निकम यांच्यासह कृष्णा निकम, चंद्रभागा निकम, दगडू निकम हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. आरती निकम यांचे पती कृष्णा निकम हे कामथे चिपळूण येथे चालक म्हणून काम करतात. दररोज ते कुटगिरी ते कामथे दुचाकीने ये- जा करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी घरी परतत असताना कुंभारखाणी येथे रविंद्र काजवे यांचे मुलासमवेत भांडण झाले.
याचा राग मनात धरून रविंद्र काजवे, रोहीत काजवे (कुचांबे), सुरज कदम, शुभम कदम (कुटगिरी निकमवाडी) व अन्य ९ अनोळखी व्यक्तींनी कृष्णा निकम यांना मारहाण केल्याचे फीर्यादीत आरती निकम यांनी नमूद केले आहे
www.konkantoday.com