रत्नागिरी जिल्ह्यात आणखी १४ कोेरोना बाधित रुग्ण सापडले, जिल्ह्यात एकूण पॉजिटिव रुग्णांची संख्या २७०
रत्नागिरी जिल्ह्यातून काल मिरज येथे पाठवण्यात आलेल्या कोरोना संशयितांचे १२२ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव आले आहेत.उर्वरीत अहवाल निगेटिव आले आहेत.तसेच आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे.आज १४ पॉझिटिव आलेल्या रुग्णांपैकी रत्नागिरी ४,लांजा येथील ३,गुहागर येथील ३,कामथे येथील ३,दापोली येथील १ रुग्ण आहेत.
www.konkantoday.com