रत्नागिरीतील दोन तरुणांनी स्वच्छतेचा संदेश देण्याकरिता झोपडपट्टीत वाटले डेटॉल साबण
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ धुण्याचा संदेश सर्वत्र दिला जात आहे.स्वच्छ हात धुतल्यास कोरोना पासून दूर राहता येऊ शकते.परंतु समाजातील सर्व घटकांना हे करता येत नाही.हे ओळखून रत्नागिरीतील दोन तरुण गौरव गांधी व तरुणी कश्ती शेख यांनी रत्नागिरी शहरातील झाडगाव भाट्ये आणि आठवडा बाजार येथील झोपडपट्टीत डेटॉल साबणाचे वाटप केले.
कोरोना पासून दूर राहण्याकरिता प्रत्येकाने सारखे हात धुतले पाहीजे हा संदेश झोपडपट्टीतील लोकांना मिळण्याकरिता त्यांनी झोपडपट्टीतील प्रत्येक घरात पाच साबणांचे वाटप केले.या तरुणांनी एकूण ६५० डेटॉल साबण या विविध झोपडपट्टी मध्ये वाटले.या अशा उपक्रमातून नक्कीच झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये सुद्धा कोरोना विषयी जागृती निर्माण होईल.
www.konkantoday.com