गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे- आमदार रोहित पवार

कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतलाय. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाबतची चाचणी संख्या वाढली म्हणून रुग्ण संख्या वाढतेय, असा दावा त्यांनी यावेळी केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button