सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण संस्थेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सह्याद्री ज्येष्ठ सेवा योजना
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य आहे. मात्र या लोकांची बँकांची कामे तसेच औषधे आदी कामांसाठी त्यांना बाहेर पडावे लागत असते. मात्र आता या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सह्याद्री निसर्ग मित्रमंडळ चिपळूण यांनी या नागरिकांसाठी मोफत सह्याद्री ज्येष्ठ सेवा ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांची बँकेची कामे करणे, पोस्टाची कामे करणे, विविध बिले भरणे, औषधे आणून देणे, गॅसची नोंदणी करणे, जिन्नस आणणे इ. प्रकारची कामे केली जाणार आहेत. यासाठी ६० वर्षावरील गरजू ज्येष्ठ नागरिकांनी ही सेवा पाहिजे असल्यास खालील मोबाईल नंबरवर ९४२३८३१७००/ ९८८१५७५०३३ येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही सेवा मोफत असली तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी संस्थेला देणगी द्यावी तसेच या सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचीही गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. संस्थेच्यावतीने चिपळूणमध्ये ही नवीन सेवा चालू करण्यात येत आहे, त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव उदय पंडीत व अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले आहे.
www.konkantoday.com