पायवाटेच्या वादावरून चिपळुण शहरातील नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल
चिपळुण शहरात पायवाटेच्या वादावरून शहरातील मार्कंडी येथील एका नगरसेवकाने संरक्षण भिंत पाडल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक उमेश धोंडिराम सकपाळ यांच्यासह सुधाकर धोंडिराम सकपाळ, महेश धोंडिराम सकपाळ व अन्य बारा अशा एकूण १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्रवीण पांडुरंग सावर्डेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सावर्डेकर यांच्या घरालगत नगरसेवक उमेश सकपाळ यांच्या वडिलांच्या मालकीची जमीन आहे.सकपाळ व सावर्डेकर यांच्यात चिपळूण न्यायालयात दावा दाखल आहे.
www.konkantoday.com