दक्षिण रत्नागिरी जिल्हा भा.ज.पा सांस्कृतिक आघाडी संयोजक म्हणून प्रसिद्ध गायिका सौ.मुग्धा भट सामंत यांच्या नावाची घोषणा
रत्नागिरीतील प्रतिथशय गायिका सौ.मुग्धा भट सामंत यांची द.रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक आघाडी संयोजक म्हणून नियुक्ती जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी घोषित केली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते संघटीत करावे. भा.ज.पा म्हणून सांस्कृतिक चळवळी प्रोस्ताहन द्यावे म्हणून सांस्कृतिक आघाडीचे काम करणे अपेक्षित आहे. यापूर्वी प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांची शहर सांस्कृतिक आघाडी संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी मध्ये ज्यांनी अनेक वर्ष संगीत साधना केली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी ज्या सन्मानित आहेत आणि ज्यांना मोठा जनाधार व लोकप्रियता लाभली आहे. कला क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते. संगीत साधलेला ज्यांनी वाहून घेतले. अनेक नवोदित गायकांना मार्गदर्शन करण्याचे काम ज्या सातत्याने करीत आहेत अशा सौ. मुग्धा भट सामंत यांची नियुक्ती भा.ज.पा ने केल्याने सांस्कृतिक आघाडी अधिक जोमाने काम करेल. सांस्कृतिक क्षेत्रात भा.ज.पा चे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. यासर्वांना संघटीत करून भा.ज.पा विचारधारेजवळ एकरूप करत सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्याचे काम सौ.मुग्धा भट सामंत करतील या विश्वासाने ही महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ.मुग्धा भट सामंत यांचे जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन, सौ. राजश्री शिवलकर, भा.ज.पा महिला शहराध्यक्ष, हेरंब जोगळेकर शहर सांस्कृतिक आघाडी प्रमुख सचिन करमरकर शहरध्यक्ष भा.ज.पा यांचेसह अनेक नेत्यांनी अभिनंदन केले आहे.